loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण येथे ६ व ७ डिसेंबरला भरतनाट्यम नृत्याविष्कार कार्यक्रम

मालवण, 5 डिसें.: तालुक्यातील भरड येथे श्री दत्त मंदिर तसेच आचरे येथील श्री देव रामेश्वर मंदिर या ठिकाणी सायली वाळके आणि मानसी पराडकर यांचे भरतनाट्यम नृत्याविष्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सुप्रसिद्ध आचार्य पार्वतीकुमार (दादा), गुरु डॉ. संध्या पुरेचा ताई आणि भावना ताई शाह यांच्या आशिर्वादाने, तसेच रागेश्री पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भरड येथे ६ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ ते ८ तर आचरे येथे ७ डिसेंबर २०२५ संध्याकाळी ५ ते ६ येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सायली वाळके आणि मानसी पराडकर या रसिकांसमोर भक्तीरंग - पारंपरिक भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर करणार आहेत. या कार्यक्रमात कौतूकम, अलारिप्पु, तिल्लाना तसेच मराठी भक्तीपदांचे सादरीकरण होणार आहे. याचे निर्मिती सहाय्य चैतन्य - अस्सल मालवणी यांचे आहे. कार्यक्रमाच्या आयोजक रागेश्री पारकर या स्वत: मुंबईस्थित सुप्रसिद्ध समर्पित नर्तकी, उत्कट गुरु, कुशल कोरियोग्राफर, अभ्यासक्रम निर्मितीची उत्तम जाण असलेली आणि प्रभावी प्रशासक आहेत. कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये पदव्युत्तर, आणि ऑकलंड युनिव्हर्सिटी (न्यूझीलंड) मधून एमबीए शिक्षणाचा हा दुहेरी संगम त्यांच्या कलेला अधिक झळाळी देतो. ४० वर्षे गुरु डॉ. संध्या पुरेचा यांच्या सान्निध्यात प्रशिक्षण घेतले आहे. स्व. आचार्य पार्वतीकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनय दर्पणम् या प्राचीन ग्रंथाचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. ‘श्रृंगार मणी’ पुरस्काराने त्या सन्मानित असून भारत, इटली, अमेरिका आणि न्यूझीलंडमध्ये त्यांचे नृत्य सादरीकरण झाले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg