loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेचा १२० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

गावखडी वार्ताहर : जि. प .आदर्श शाळा पूर्णगड नं.१ ता.जि रत्नागिरी या शाळेचा १२० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. शाळा स्थापन होऊन १२० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेचा परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता, शाळेचा जयघोष करत रॅली काढण्यात आली. शाळेचा वाढदिवस साजरा व्हावा म्हणून केकही कापण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला. या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले ‌. उपक्रम यशस्वीततेसाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक-पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, विशेष शिक्षिका तृप्ती शिरगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. "शाळेने हे वर्ष संकल्प वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे. "शाळेच्या या उपक्रमाविषयी शिक्षण विस्तार अधिकारी बीट पावस आदरणीय हिरवे मॅडम, केंद्रप्रमुख श्री संजय राणे सर यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेच्या या उपक्रमाविषयी सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg