loader
Breaking News
Breaking News
Foto

उंबर्डे व मांगवली येथील मोबाइल टॉवरची केबल चोरीप्रकरणी टेम्पो चालकास टेम्पोसह ताब्यात

वैभववाडी प्रतिनिधी : उंबर्डे व मांगवली येथील मोबाइल टॉवरची सुमारे 50 हजार रुपये किमतीची केबल व इतर साहित्य चोरी प्रकरणी वैभववाडी पोलिसांनी पुणे येथून एका टेम्पो चालकास टेम्पो सह ताब्यात घेतले आहे प्रथमेश राजकुमार शिंदे वय वर्षे 20 राहणार कर्नाटक सध्या राहणार पुणे असे या संशयित आरोपीचे नाव आहे याबाबत बी फोर्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फील्ड ऑफिसर्स सुहास दत्ताराम चव्हाण यांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी वैभववाडी पोलीस ठाणे तक्रार दिली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे भुतेवाडी व मागवली बौद्धवाडी येथे खाजगी कंपनीचे मोबाईल टॉवर आहे तेथील ॲल्युमिनियम धातूची केवल व इतर साहित्य अशी सुमारे 50 हजार रुपये किमतीचे साहित्य दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी चोरीस गेले होते याबाबत बी फोर्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फील्ड ऑफिसर सुहास दत्ताराम चव्हाण यांनी वैभववाडी पोलीस ठाणे तक्रार दिली होती याबाबत वैभववाडी पोलिसांनी सखोल चौकशी केली असता टेम्पो क्रमांक एम एच 12 एन एक्स 91 15 या टेम्पो साहित्य भरून घेऊन जात असताना सदर टेम्पो एका ठिकाणी रुतला होता हा टेम्पो बाहेर काढण्यासाठी एका स्थानिक ट्रॅक्टर वाल्याने त्याला मदत केली होती तक्रारीनंतर त्याच्याही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सदर टेम्पो चालक हा पुणे येथील असल्याचे समजले वैभववाडी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल रणजीत सावंत किरण मेते हरीश जायभाय यांच्या पथकाने टेम्पो चालकाला पुण्यात जाऊन ताब्यात घेतले व वैभववाडी पोलिसात हजर केले

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg