loader
Breaking News
Breaking News
Foto

हर्णे येथे मत्स्य ओटा आणि रॅम्प या विकासकामांच भुमिपुजन

खेड (प्रतिनिधी)- हर्णे किनाऱ्यावरील छोट्या होड्यांसाठी रॅम्प आणि मत्स्य ओटा उभारणीची मागणी ना. योगेशदादा कदम यांच्याकडे स्थानिक मच्छिमार बांधवांनी केली होती. त्यानुसार त्याला मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला. सुमारे ६५ लाख अंदाजित खर्चाचा रॅम्प आणि मत्स्य ओटा बांधकामाचे भूमिपूजन ना. योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि छोटी होडीवाले संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम देवघर यांच्या हस्ते हर्णे येथे संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मासेमारी व्यवसायास कृषिचा दर्जा देण्यात आला असल्याने जास्तीत जास्त निधी मासेमारी व्यवसायासाठी उपलब्ध होत आहे. याचा फायदा हा हर्णे आणि इतर किनारपट्टी कडील गावांना होणार असून ही आपणा सर्वांसाठी भविष्यात समाधानाची बाब असणार आहे असे प्रतिपादन योगेशदादा यांनी याप्रसंगी केले.

टाइम्स स्पेशल

या भूमिपूजनाप्रसंगी छोटी होडीवाले संघटनेचे उपाध्यक्ष जयदास रघुवीर, शिवसेना तालुका प्रमुख उन्मेष राजे, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई, माजी जि. प. समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, हर्णे गावच्या सरपंच धाडवे ताई, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg