loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबके ते कोरेगांव दरम्यान गांजा या अंमली पदार्थांसह २२,४४५ /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त !

खेड (वार्ताहर) - तालुक्यातील मुंबके ते कोरेगांव दरम्यान मुख्य रस्त्यालगत गांजा या अंमली पदार्थांसह एकूण २२ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २:४० वाजताच्या दरम्यान करण्यात आली. खेड पोलीस स्थानकाचे शिपाई विजेंद्र रमेश सातार्डेकर यांनी फिर्याद दाखल केल्यानुसार, येथील पोलीसांनी संशयित आरोपी राहीद अब्दुल रऊफ जमादार (वय-३५) व मुरसलीन बशीर नाडकर (वय ३०.,दोघेही रा. संगलट मोहल्ला., ता. खेड ) या दोघांविरोधात गुन्हा रजि. नं. ३३२/२०२५, एन. डी. पी. एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील संगलट मोहल्ला येथील संशयित आरोपी राहीद अब्दुल रुऊफ जमादार व मुरसलीन बशीर नाडकर या दोघांनी २० रुपयांच्या प्लास्टिक पॅकींग पिशव्यातून २ हजार ४२५ रुपये किंमतीचा एकूण १६२ ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा हा अंमली पदार्थ विक्रीकरीता बाळगलेल्या स्थितीत आणि संशयित आरोपी मुरसलीन बशीर नाडकर याच्याकडील १० हजार किमतीचा मोबाईल तसेच संशयित आरोपी राहीद अब्दुलरूऊफ जमादार याच्याकडील १० हजार किंमतीचा मोबाईल असा एकूण गांजा या अंमली पदार्थांसह २२ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg