loader
Breaking News
Breaking News
Foto

वादळा मधे परिस्थितीशी जुळवुन घेतले - तांडेल मोहित पटेकर

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - वादळामध्ये अडकलेल्या नावाशेवा येथील गावदेवी मरीन या बोटीवरील जिल्ह्यातील १७ मच्छिमार सुखरूप घरी आले यामध्ये रत्नागिरीमधील गावडे आंबेरे साखरतर व तालुक्यातील नवानगर धोपावे कुडली येथील मच्छीमारांचा समावेश होता. यामध्ये गावदेवी मरीन बोटीचे नवानगर येथील तांडेल मोहित बबन पटेकर (वय ३४) यांच्यासह दहा मच्छीमार तसेच कुडली येथील दोन धोपावे तीन तसेच रत्नागिरी मधील गावडे आंबेरे एक साखरतरमधील एक या मच्छीमारांचा समावेश होता. त्याबाबत माहिती देताना गावदेवी मरीन बोटीचे तांडेल मोहित पटेकर यांनी सांगितले की केले पंधरा वर्षे मच्छीमारी व यामधील दहा वर्षे तांडेल म्हणून काम पाहत आहे एवढे दिवस वादळाची संपर्क होत राहण्याची पहिलीच वेळ होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२२ ऑक्टोबरला करंजा येथून नेहमीप्रमाणे मच्छीमारीसाठी गेलो होतो. दोन दिवसानंतर २४ तारखेला जोरदार वादळाला सुरुवात झाली आणि संपर्कही तुटला यावेळी मच्छीमारी थांबवली जोरदार वारे वाहत असल्याने बोटही हेलकावे खात होती काय करायचे मार्ग सापडत नव्हता तरी आम्ही या बिकट परिस्थितीशी जुळवून घेतले आम्ही कोणीही मच्छीमार न घाबरता या परिस्थितीचा सामना करत होतो एक दिवस नक्की आमच्या संपर्क होऊन आम्ही घरी परतणार याचा आम्हाला विश्वास होता. बोटीवर काही दिवसांचे खाद्यपदार्थांचे साहित्य मुबलक प्रमाणात असल्याने कोणाचेही खाण्यापिण्याचे हाल झाले नाहीत तब्बल आठ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर गुजरातमधील भागात असताना पहिल्यांदा नवानगर गावातील ग्रामस्थ राहुल कोळथरकर यांच्याशी संपर्क झाला व सर्वांनीच सुस्कारा सोडला

टाइम्स स्पेशल

इथूनच आमच्या परतीचा प्रवास सुरू झाला ३१ तारखेला रात्री नऊ वाजता आम्ही करंजा बंदरावर उतरलो. याबाबत वेलदूर येथील बाप्पा मोरया बोटीचे मालक सागर पड्याळ यांनी सांगितले की माझी बोट ही नावाशिवाय येतेच कंत्राटी पद्धतीने चालवण्यास दिली आहे त्यामुळे या बोटीवरील सर्व मच्छीमार बाहेर जिल्ह्यातील होते तसेच नावाशेवा येतील चंद्राई बोटीवर नवानगर येथील विघ्नेश जांभारकर हे तांडेल होते गावदेवी मरीन बोट ही गुजरात समुद्री भागात एकटीच होती या बोटीवर १७ मच्छीमार होते तर अन्य तीन बोटींवर सतरा असे एकूण ३४ मच्छीमार आठ दिवस समुद्री लाटांशी झुंजत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg