दापोली (प्रतिनिधी) - निगडे गावाकडून दापोलीकडे येणाऱ्या एका भरधाव डंपरने स्वागत कमानीला जोरदार धडक दिल्याने नेमके याच ठिकाणाहून दापोलीकडून निगडे गावाकडे निघालेल्या एस. टी. बसच्या मागील शिडीकडील भागावर स्वागत कमानीचा भाग तुटून पडल्याने एस.टी. बस चे नुकसान झाले आहे. बसमध्ये असलेल्या दोन प्रवाशांना त्यांच्या सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही मात्र या झाल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ दापोली एस.टी. आगाराच्या एटीएस प्रभुणे, कार्यशाळा अधिक्षक मुनाफ राजापकर, वाहतूक निरीक्षक बांद्रे, दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, पोलिस उप निरीक्षक प्रकाश मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले.
या अपघाताच्या घटनेची दापोली पोलीस ठाण्यात रितसर नोंद करण्यात आली असून या घटनेबाबत दापोली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भास्कर शामराव दर्शने (वय ३५) मूळ राहणार मारतळा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड, सध्या राहणार काळकाई कोंड, दापोली हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दापोली एस.टी. आगारात वाहक कम चालक पदावर कार्यरत असलेले कर्मचारी आपल्या ताब्यातील एस.टी .बस क्रमांक एम. एच. 20 बी. एल. 2243 ही दापोली आगाराची एस. टी.बस दापोलीहून निगडे गावाकडे घेऊन जात असताना निगडे गावाच्या वेशीवर असलेल्या स्वागत कमानी जवळ एस.टी.बस प्रवासी घेण्यासाठी थांबवत असतानाच समोरुन भरधाव वेगात उताराच्या दिशेने येणाऱ्या आयशर कंपनीच्या एम. एच.08 जी. 2700 क्रमांकाच्या दापोलीकडे येणाऱ्या डंपरवरील निखील रवी चव्हाण रा. खेड ता. खेड जि. रत्नागिरी या चालकाने समोरुन निगडे गावच्या वळणावर असणाऱ्या कमानीला जोरदार धडक दिली.
या जोरदार धडकेमुळे कमान पुर्ण कोसळुन कमानीचा वरील भाग तुटून चालक भास्कर शामराव दर्शने यांच्या ताब्यातील एस.टी बस क्रमांक MH-20 BL-2243 हिच्या पाठीमागील शिडीवर पडुन नुकसान झाले. पाठीमागील उजव्या बाजुच्या टायरच्या पाठीमागे धडक दिल्याने एस.टी बस चा पत्रा फाटुन नुकसान होवुन अपघात झाला. सदर अपघातामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी 17 मे 2026 मे रोजी सकाळी 8.35 वाजता घडली. या अपघाताच्या घटनेचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ अशोक गायकवाड हे करीत आहेत.


























































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.