खेड (प्रतिनिधी) - संपूर्ण महाराष्ट्रात इंधन तुटवड्याचे सावट असताना आता कोकणातही त्याचे गंभीर परिणाम जाणवू लागले आहेत. उन्हाळी सुट्ट्यांसाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल होत असल्याने सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिणामी स्थानिक रिक्षाचालक, स्कूलबस चालक तसेच सीएनजीवर चालणाऱ्या भाडेकरू वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
सीएनजी भरण्यासाठी तब्बल चार-चार तास रांगेत उभं राहावं लागत असल्याने वाहन चालकांचा वेळ आणि उत्पन्न दोन्हीवर परिणाम होत आहे. “पोट पुढं भरायचं कसं?” असा सवाल आता स्थानिक वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे स्थानिकांच्या रोजीरोटीवर परिणाम होत असल्याची भावना चालक संघटनांनी व्यक्त केली आहे.
या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आज विविध वाहन चालक संघटना एकत्र येत खेड शहरातील तहसीलदार, प्रांत अधिकारी तसेच खेड पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. सीएनजी पुरवठा सुरळीत करावा, स्थानिक वाहन चालकांना प्राधान्य द्यावे आणि या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.


























































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.