loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड येथे दिव्यांग खेळाडूंची "रत्नागिरी कोकण चषक 2026' क्रिकेट स्पर्धा उत्साहात

खेड (प्रतिनिधी) - खेड नगरपरिषदचे विद्यमान नगरसेवक रहिमभाई सहिबोले (गट नेता भारतीय जनता पार्टी) व अनिल भेकरे अँड सन्स पुरस्कृत, दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित निमंत्रीत जिल्हा संघ रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, या दिव्यांग खेळाडूंच्या जिल्हा संघाची एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन खेड नगरपरिषद नवीन मैदान येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेचा उदघाट्न समारंभाप्रसंगी खेडच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, नगरसेवक रहिमभाई सहिबोले, मा. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सावंत, उमेश नक्षे, मुझप्पर तांबे, महेमूद खान, ऍंड.जावेद शिरळकर, जनार्धन पवार, राजेंद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात क्रीडा रसिकांची मने जिंकत सोलापूर जिल्हा संघाने प्रथम क्रमांक, कोल्हापूर जिल्हा संघाने द्वितीय क्रमांक मिळविला तर रत्नागिरी संघाने तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज विकी (सोलापूर), उत्कृष्ट गोलंदाज राहुल सुतार (कोल्हापूर), मालिकावीर सचिन पवार (सोलापूर) या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg