loader
Breaking News
Breaking News
Foto

जानवळे गावातील सांडपाण्यामुळे बाधीत झालेल्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा - मनसेची मागणी

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये सांडपाण्यामुळे बाधीत झालेल्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा त्वरित पुरवठा करण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी, या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, ग्रामपंचायत पाटपन्हाळे श्राृंगारतळी बाजारपेठ व इतर ठिकाणावरुन ओझरवाडी येथून वाहणार्‍या नदीमध्ये सोडलेल्या सांडपाण्यामुळे या नदीच्या आजूबाजूला असणार्‍या वैयक्तिक व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झालेले आहेत त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या सांडपाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित झालेल्या कुटूंबाला गुहागर पंचायत समिती मार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा म्हणून आपणास विनंती करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या परिसरातील स्तोत्र दूषित झाल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व शृंगारतळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या माध्यमातून येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. परंतु आजतागायत पंचायत समिती गुहागर यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची पिण्याची पाण्याची व्यवस्था या नागरिकांना करण्यात आली नाही. मध्यंतरी गुहागर पंचायत समितीचे सभापती तसेच अन्य अधिकारी यांनी दूषित पाण्याची समस्या भेडसावणार्‍या भागाची पाहणी केली. परिसरातील नागरिकांनी तेथील समस्या कथन केली होती तरीसुद्धा आजही येथील ग्रामस्थांना दूषित पाण्याची समस्या उद्भवत आहे.

टाईम्स स्पेशल

जानवळे ग्रामपंचायत माध्यमातून विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य असून कोणीही पाणी पिण्यासाठी वापर करू नये अशा प्रकारच्या सूचनाचे फलक लावले आहेत. परंतु या संदर्भात दूषित सांडपाणी सोडणार्‍या लोकांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई अद्याप करण्यात आली नाही. सदरची समस्या गेली अनेक वर्ष या नागरिकांना उद्भवत असून अजून किती वर्षे दूषित पाण्याची समस्या येथे नागरिकांना भेडसावणार आहे. शासन स्तरावरून या नागरिकांना साध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जर करण्यात येत नसेल तर यासारखे दुर्दैव कोणते....? तरी तातडीने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गुहागर पंचायत समितीने करावी नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जन आंदोलन छेडले जाईल याची दक्षता घ्यावी, असे विनोद गणेश जानवळकर यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg