loader
Breaking News
Breaking News
Foto

विवाहितेला शिवीगाळ व धमकी; एकावर गुन्हा दाखल

लांजा (वार्ताहर) - विवाहितेला शिवीगाळ, अश्लील हावभाव तसेच धमकी दिल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवार दि. १६ मे रोजी सकाळी ९.३० वाजता तालुक्यातील साटवली भंडारवाडी येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी आणि आरोपी हे नात्याने चुलत सून, सासू, सासरे व दीर आहेत. त्यांच्यामध्ये सामायिक जमिनीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. शनिवार दि. १६ मे रोजी सकाळी ९.३० वाजता फिर्यादी प्रांजल प्रसाद चव्हाण (३८ वर्षे, रा. साटवली भंडारवाडी) यांच्या घरातील सर्व माणसे अंगणात बसलेली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी त्यांचे चुलत सासरे मारुती यशवंत चव्हाण यांना सुरेश यशवंत चव्हाण, सुनिता सुरेश चव्हाण व जितेंद्र सुरेश चव्हाण (रा. साटवली लावगणवाडी) यांनी हाताच्या थोपटाने मारहाण केली. तर जितेंद्र चव्हाण (३५ वर्षे, रा. साटवली लावगणवाडी) यांनी प्रांजल चव्हाण यांना हाताने ढकलून दिले. तसेच मनात लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केले. तसेच शिवीगाळ करून तुझ्या नवऱ्याला कसे अडकवतो बघ अशी धमकीही त्याने प्रांजल चव्हाण यांना यावेळी दिली.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, याप्रकरणी प्रांजल प्रसाद चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी जितेंद्र चव्हाण यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे ७९, ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टे. नासिर नावळेकर हे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg