loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबस्ते मळदेवाडी येथे ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न; 'फिझान वॉरियर्स' सलग चौथ्या वर्षी विजेता

संगमेश्वर : तालुक्यातील कळंबस्ते मळदेवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. 'श्री. छत्रपती संभाजी महाराज प्रीमियर लीग' अंतर्गत आयोजित या स्पर्धेत कळंबस्ते पंचक्रोशीतील एकूण दहा संघांनी सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखवले. अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना ग्लोविंग फॅमिली विरुद्ध कळंबस्ते फिझान वॉरियर्स यांच्यात झाला. या चुरशीच्या सामन्यात कळंबस्ते फिझान वॉरियर्स संघाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे रोख रुपये ५०,००० व चषक पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे, फिझान वॉरियर्स क्रिकेट क्लबने सलग तीन ते चार वर्षे प्रथम विजेता संघ राहण्याचा आपला दबदबा कायम ठेवला आहे. उपविजेता म्हणून ग्लोविंग फॅमिली संघाला रोख रुपये २५,००० व चषकाने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जि.प.सदस्य कुवळेकर मॅडम यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर श्री. प्रदीप नागवेकर, विजय तांबे, सौरभ निरूळकर, राजा महाडिक, मिलिंद गुरव, कॅप्टन पवन यशवंत कदम आणि फिझान वॉरियर्स संघाचे कर्णधार फिरोज नेवरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg