loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

दापोली (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत नागरी भागाकरिता दापोली येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात २७ अर्जदारांपैकी ९ लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार अतिक्रमण नियमाकुल करून पट्टे वाटप करण्यात आले. उर्वरित १८ लाभार्थी यांचेकडून अर्ज प्राप्त झाले असून त्रुटींची पूर्तता करून त्यांनाही लवकरच पट्टे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापूर्वी मुगीज इकबालनगर येथे एकूण ५ लाभार्थ्यांना जुन्या शासन निर्णयानुसार शक्ती प्रदत्त समितीकडून प्रस्ताव सादर करून अपर जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार पट्टे वाटप करून सर्वांसाठी घरे अंतर्गत सर्वांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. यावेळी दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, नगराध्यक्ष कृपा घाग, जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, सुवर्णा यांचेसह दापोली नगरपंचायतिचे नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg