loader
Breaking News
Breaking News
Foto

पेट्रोल, डिझेलसह गॅस आणखी महागणार?

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३ रुपये वाढ केल्यानंतरही तेल कंपन्यांचा तोटा भरुन निघत नसल्याने या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याचे स्पष्ट संकेत पेट्रोलियम मंत्रालयाकडून मिळाले आहेत. तेल कंपन्यांनी किमान १० रुपये प्रति लीटर दर वाढविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा किमान ३ रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर स्वयंपकाचा गॅसही महागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून सवलतीच्या दरात मिळणार्‍या तेलाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे सार्‍या जगात पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेल आणि इंधनाच्या दरांचा भडका उडण्याची शक्यता असून सार्‍या जगाची चिंता वाढली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इराण विरुद्ध अमेरिकेने पुकारलेल्या युद्धामुळे सार्‍या जगात इंधनाच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. महागाईचे संकट दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करत असतानाच आत्ता आहेत त्याहीपेक्षा पेट्रोल-डिझेलच्या किंमती अधिक वाढणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे सार्‍या जगाची चिंता वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २८ तारखेपासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला संघर्ष, त्यात इराणने केलेली होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी आणि त्यापुढे अमेरिकेने सुरू केलेली गस्त यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाची टंचाई जाणवू लागली आहे. तसेच पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे खनिज तेलाचे दर मोठ्या प्रमाणात भडकू लागले आहेत. खनिज तेलाच्या किमती वाढल्याने भारतासह संपूर्ण जगात पेट्रोल-डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचाही भडका उडण्याची शक्यता आहे.

टाईम्स स्पेशल

याबाबतच्या अधिक माहितीनुसार, जागतिक तेल संकटा दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन खनिज तेलाच्या खरेदीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांवर देण्यात आलेल्या सवलतीला मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ही सवलत समाप्त झाली आहे. तसेच ट्रम्प यांचा हा निर्णय भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भारत आखाती देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत होती. त्यामुळे आता या निर्णयाचा भारतातील खनिज तेलाच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. रशिया हा जगातील खनिज तेलाचा प्रमुख निर्यातदार देश आहे. त्यामुळे जागतिक तेल बाजारासाठीही डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे एक मोठा धक्का मानला जात आहे. तसेच या निर्णयामुळे जगभरातील पेट्रोल-डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमती आणखीनच भडकण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg