loader
Breaking News
Breaking News
Foto

दादासाहेब सरफरे विद्यालयाचे स्वराज्य किल्ले व मुद्रा भित्तीचित्र स्पर्धेत दैदिप्यमान यश

बुरंबी (संगमेश्वर) - येथील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे दादासाहेब सरफरे विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ३६९ व्या जयंती निमित्त, महाराष्ट्र शासन व स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती कसबा संगमेश्वर विद्यमाने आयोजित स्वराज्य किल्ले व भव्य मुद्रा भितीचित्र स्पर्धा २०२६ मध्ये सहभाग घेवून सुयश संपादन केले आहे. संगमेश्वरमधील कसबा येथे आयोजित या स्वराज्य किल्ले व भव्य मुद्रा भितीचित्र स्पर्धेत स्वराज्य किल्ले बनविने प्रथम गटामध्ये (सिंधुदुर्ग किल्ला) ओंकार सखाराम रामाणे, वेदांत रमेश घडशी (१०वी) व सार्थक संतोष बेटके (९ वी) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यांस मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम ५०००/-व सन्माचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तर द्वितीय गटात स्वराज्य किल्ले बनविने (रायगड किल्ला) सार्थक सखाराम रामाणे, त्रिवेश राजाराम बाचम, अब्दुल हकीम दावलसाहब शेख (९ वी) यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. या गटास मान्यवरांच्या हस्ते रोख रु.४०००/- व सन्माचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तर तृतीय गटात स्वराज्य किल्ले बनविने (पन्हाळा किल्ला) इ. ८ वी मधील मानस विलास घडशी, श्लोक शशिकांत घडशी व रुद्र संतोष चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. या गटास मान्यवरांच्या हस्ते रोख रु.३००० व सन्माचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच खुल्या गटामध्ये स्वराज्य किल्ले बनविने (जंजिरा किल्ला) प्रशालेतील स्वस्य उदय भुरवणे, सोहम सचिन भुरवणे, स्वरा राजेंद्र बाईत आणि साववी जितेंद्र बाईत यांनी चतुर्थ क्रमांक पटकाविला. या गटास मान्यवरांच्या हस्ते रोख रु. २०००/- व सन्माचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. भव्य मुद्रा भितीचित्र रेखाटनामध्ये प्रशालेचे कला शिक्षक प्रदीप कृष्णा शिवगण यांनी काढलेले चित्र उपस्थित परीक्षक, मान्यवर व कला रसिक यांच्या कौतुकास पात्र ठरले. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य चित्र "चुकीला माफी नाही". या चित्रास प्रथम क्रमांक मिळाला. या चित्रास मान्यवरांच्या हस्ते प्रथम बक्षिस रु २५,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. हे चित्र उपस्थित परीक्षक, मान्यवर व कला रसिक यांच्या कौतुकास पात्र ठरले. तर त्यांनी काढलेले महाराष्ट्रातील पर्यटन, संत परंपरा व कला व व्यवसाय अशी थीम असलेले चित्रास उत्तेजनार्थ म्हणुन मान्यवरांच्या हस्ते रोख रु. २०००/- बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमास स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष राजेंद्र महाडीक, माजी आमदार सुभाष बने, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजाराम चव्हाण, डी कॅड कॉलेज देवरुखचे प्राचार्य रणजीत मराठे इ. मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष दिलीपराव माने, उपाध्यक्ष प्रताप नारायण देसाई, शाळा समिती अध्यक्ष दिनेश जाधव व प्रशालेचे मुख्याध्याप प्रकाश विरकर यांनी अभिनंदन केले आहे, संस्था सरचिटणीस शरद गोविंद बाईत यांनी स्वराज्य महोत्सव २०२६ अंतर्गत आयोजित हिंदवी चित्रकला स्पर्धा व भितचित्र स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश यांनी बोलताना,-संपादन करून संस्थेचा मान उंचावल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या अप्रतिम कलात्मक कौशल्याने, सृजनशीलतेने आणि अथक परिश्रमांनी विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. आपल्या या यशामुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले आहे. आपली कला, जिद्द आणि समर्पणभाव भविष्यातही अशीच उज्ज्वल यशाची शिखरे गाठत राहो" असे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg