लांजा (वार्ताहर) - शहरातील साई समर्थ रेसिडन्सी येथून एक ४२ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली असून याबाबतची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत लांजा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव चंद्रकांत चोरगे (४२ वर्षे, रा. साई समर्थ रेसिडन्सी एफ विंग रूम नं.१०३, लांजा, ता. लांजा) हे गुरुवारी १४ मे रोजी मला रत्नागिरी एस. पी. ऑफिस रत्नागिरी येथे बोलावले आहे, असे पत्नीला सांगून रत्नागिरी येथे जाण्यासाठी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. स्वतः च्या मालकीची नॅनो गाडी (क्र. एमएच. ०४. एफझेड. ०३३०) घेऊन ते रत्नागिरी येथे जाण्यासाठी निघाले. त्यानंतर सायंकाळी ते उशिरापर्यंत घरी न आल्याने व त्यांचा मोबाईलवरून देखील संपर्क होऊ न शकल्याने अखेर त्यांची पत्नीने त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते कोठेही आढळून न आल्याने अखेर त्यांची पत्नी अस्मिता वैभव चोरगे (४१ वर्षे, रा. साई समर्थ रेसिडन्सी एफ विंग रूम नं. १०३, लांजा, ता. लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान, बेपत्ता झालेल्या वैभव चोरगे यांची उंची अंदाजे ५ फूट ८ इंच, चेहरा उभट, रंग सावळा, केस काळे, नाक सरळ तर अंगावर फुल शर्ट, फुल पँट व पायात ब्राऊन कलरची सँडल, हातात घड्याळ, गळ्यात चांदीची चैन असे त्याचे वर्णन असून सोबत पांढऱ्या रंगाची (एमएच.०४.एफझेड.०३३०) क्रमांकाची नॅनो गाडी आहे. तरी संबंधित व्यक्ती कोणाला आढळून आल्यास त्वरित लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन लांजा पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार करत आहेत.


























































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.