संगमेश्वर (सत्यवान विचारे) - कसबा गावातील भिंतीमधून कोकण आणि महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडत असून पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. ऐतिहासिक कसबा गावाला सांस्कृतिक महत्व आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कसबा नगरीला कोकण संस्कृतीचे दर्शन व्हावे या हेतूने कसबा याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त महाराष्ट्र आणि कोकण संस्कृतीवर भिंती पत्रक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती अध्यक्ष राजेंद्र महाडिक यांच्या पुढाकारणे आणि महाराष्ट्र शासन सहकार्याने कसबा येथे स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सलग तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये कोकण संस्कृती आणि महाराष्ट्र संस्कृतीवर आधारित वॉल पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त राज्यभरातील स्पर्धकांनी सहभागीत कसबा येथील भिंतीवर महाराष्ट्र आणि कोकण संस्कृतीचे दर्शन घडवणारे पेंटिंग साकारल्याने पर्यटकांना ते आकर्षक स्थान बनले आहे. स्पर्धेतील प्रथम विजेते संघांना बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


























































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.