loader
Breaking News
Breaking News
Foto

'लालपरी'चा प्रवास महागणार?: डिझेल दरवाढीमुळे परिवहन मंत्र्यांकडून भाडेवाढीचे संकेत

जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या तणावाचा फटका आता सर्वसामान्यांची वाहिनी असलेल्या 'एसटी बस'ला बसण्याची शक्यता आहे. देशातील इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या तिकिटात वाढ होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत परिवहन मंत्र्यांनी भविष्यातील तिकीट दरवाढीचे स्पष्ट संकेत दिले आहेत; मात्र ही भाडेवाढ तातडीने लागू होणार नसल्याने प्रवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महामंडळाच्या तिजोरीवर पडणाऱ्या आर्थिक भाराची आकडेवारी स्पष्ट केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg