loader
Breaking News
Breaking News
Foto

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला ,१२ जणांचा मृत्यू ,30 गंभीर

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे सोमवार १८ मे रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. वऱ्हाडिंनी भरलेला आयशर ट्रक आणि कंटेनर मध्ये झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकी देखील चिरडली गेली असून दुचाकीवरील दोघांसह अन्य दहा जणांचा मृत्यू झाला असून ट्रक मधील ३० ते ३५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रक मध्ये ४० पेक्षा जास्त लोक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून हे वऱ्हाड धानीवरी येथे जात असताना नवरीच्या घराजवळच हा अपघात झाला आहे. जखमींना तातडीने कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून यामधील गंभीर जखमींना धुंदलवाडी येथील वेदांत आणि गुजरात मधील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवल्याची माहिती देण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

मिळालेल्या माहितीनुसार ट्रक धानिवरी येथे पोहोचल्यावर खडकीपाडा येथे जात होता. दरम्यान मुंबई वाहिनीवरून येणाऱ्या एका कंटेनर वाहून नेणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने कंटेनरचा पुढील भाग वेगळा होऊन कंटेनर आईसर ट्रक वर पडला आहे. यामुळे माणसे कंटेनर खाली दाबून गंभीर जखमी झाली आहेत. कासा येथील रुग्णालयासमोर सध्या मोठी गर्दी झाली असून जखमींवर उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg