सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी-कोल्हापूर मार्गावरील आंबोली फणसवाडी येथे चालत्या कारवर झाड कोसळून अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडीकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका कारवर रस्त्यालगतचे एक मोठे झाड अचानक कोसळले. झाड थेट धावत्या कारवर पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भर रस्त्यात झाड कोसळल्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावरील झाड बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. पोलीस प्रशासन, वनविभाग आणि स्थानिकांच्या तात्परतेमुळे काही वेळातच रस्त्यावरील झाड हटवण्यात आले आणि सावंतवाडी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली.


























































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.