loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी घाटात कोंबडया वाहतूक करणार्‍या वाहनाला अपघात

दोडामार्ग (प्रतिनिधी) - तिलारी घाटातून कोंबडया वाहतूक करणारे वाहन घाट उतरून खाली येत असताना सदर वाहन संबंधित चालकाला नियंत्रित झाले नाही. ब्रेक लागले नसल्याने सदर वाहन रस्ता कडेला असलेल्या घळणीला जाऊन धडकले. हा अपघात आज सोमवार सकाळी घडला, या अपघातात सुदैवाने कुणी जखमी झाले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिलारी घाटात पुन्हा अपघात मालिका सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी एक मालवाहतूक टँकर धोकादायक वळणावर कठडयाला धडकून घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. तीन तासांनी वाहतूक सुरू झाली होती. घाटमाथ्यावरील हे वाहन कोंबडया भरून तिलारी घाटातून गोवा येथे जाण्यासाठी निघाले होते. अचानक घाटरस्ता उतरताना गाडीचे ब्रेक न लागल्याने गाडी रस्ता कडेला असलेल्या घळणीला धडकून उभी राहिली यामुळे मोठा अनर्थ टळला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg