सावंतवाडी : विदुषी पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षाच्या सांगते निमित्त ''माणिक मोती'' संगीत मैफिलीला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानकडून या मैफिलेचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मैफिलीचे उद्घाटन करण्यात आले. माणिक वर्मा यांनी गायलेल्या व अजरामर केलेल्या सदाबहार गीतांच्या नजराण्याने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
'माणिक मोती' या मैफिलीचे उद्घाटन सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले. राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शि.प्र. मंडळ, सावंतवाडी उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, आतापर्यंत १४ पर्यटन महोत्सव सावंतवाडीत झालेत. त्या निमित्ताने स्थानिक कलाकारांना व्यासपीठ दिले जायचे, त्यासाठी धोरणही निश्चित केले होते. न.प. ही लोकांना सुविधा देणारी संस्था असून बॅ. नाथ पै. सभागृह स्थानिक कलावंतांना विनामोबदला उपलब्ध करून द्यावे. तसेच न.प. च्या संयुक्त विद्यमाने कलाकारांना प्रोत्साहन द्यावे अशी मागणी साळगावकर यांनी केली. दरम्यान, कोकणच्या कलाकारांना प्रोत्साहन द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. स्थानिक कलावंतांना न.प. च्या नाथ पै सभागृहासह राजवाड्याच्या दरबार हॉलचीही दार उघडी राहतील, असा विश्वास नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केला.
तदनंतर पद्मश्री माणिक वर्मा यांनी गायलेल्या अजरामर केलेल्या गीतांचा सदाबहार नजराणा सादर करण्यात आला. राग भटीयारसह विजय पताका, चांदण्या रात्रीतले, कौसल्येचा राम, त्या सावळ्या तनुचे, त्या चित्त चोरट्याला, मला मदन भासे हा, जाळी मंदी पिकली करवंद, घननिळा लडीवाळा, अमृताहूनी गोड आदी गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. गायिका मंजिरी धोपेश्वरकर, नूतन परब, वर्षा देवण, सिद्धी परब, समृद्धी सावंत, केतकी सावंत, विधीता केंकरे, मानसी भोसले, पूर्वा धाकोरकर, श्रृती सावंत, सानिका गावडे, ऋचा पिळणकर, सानिका सासोलकर यांनी ही गीते सादर केली. तर साथसंगत निरज भोसले, सिद्धेश सावंत, संकेत म्हापणकर, साहिल घुबे, समर्थ केळुसकर, मंगेश मेस्त्री, भास्कर मेस्त्री यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कात्रे यांनी तर ध्वनी संयोजन स्मितेश पंडीत यांनी केले. मैफिलीच्या निमित्ताने सादरकर्त्या कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शि.प्र.मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सदगुरु संगीत विद्यालयाचे संचालक निलेश मेस्त्री, अभिनव संगीत विद्यालयाचे संचालक किरण सिद्धये, सुरश्री संगीत वर्ग संचालिका मंजिरी धोपेश्वरकर, रघुकूल स्वर विहार संचालिका नुतन परब, सोमा सावंत, संजय कात्रे, प्रतिष्ठानच्या मंगल भोसले, मानसी भोसले, प्राजक्ता भोसले, नमिता भोसले, अनिल भोसले, अण्णा देसाई, निरज भोसले, विनायक गांवस आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रदीप शेवडे, रवींद्र गांवकर, शैलेश पै, गोविंद मळगावकर, सर्वेश राऊळ यांचे विशेष सहकार्य लाभले.


























































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.