loader
Breaking News
Breaking News
Foto

इंधन टंचाईमुळे ग्रामीण महिलांसमोर स्वयंपाकाचा प्रश्न

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस, रॉकेल (केरोसीन) आणि डिझेल यांचा तुटवडा जाणवत असल्याने महिलांसमोर स्वयंपाकाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घरगुती वापरासाठी गॅस उपलब्ध होत नसल्याने (ग्रामीण भागात सिलेंडर बुकिंग 45 दिवसाची मर्यादा आहे) शेगडी पेटवणे कठीण झाले आहे. ज्यांच्याकडे एकच सिलेंडर आहे त्यांनी काय करावे, याचे उत्तर कोणा कडेच नाही. तसेच रॉकेल मिळत नसल्याने स्टोव्ह वापरणेही अशक्य झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पर्याय म्हणून डिझेल वापरून चूल पेटवण्याचा विचार केला असता, डिझेलची उपलब्धताही नसल्याने (पंप धारक बॉटल मधे डिझेल देत नसल्याने) ग्रामीण भागातील महिलांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे रोजचा स्वयंपाक, मुलांसाठी नाश्ता आणि कुटुंबासाठी जेवण बनवायचे कसे, असा प्रश्न महिलांसमोर उभा ठाकला आहे. "आम्ही स्वतः काय खायचे आणि लहान मुलांना काय द्यायचे?" असा संतप्त सवाल ग्रामीण भागातील महिला प्रशासनाकडे करत आहेत. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन इंधनपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg