दापोली (प्रतिनिधी) - राजापूर गावात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांसह मुंबई शहरात कामधंदा, व्यवसायानिमित्त राहणाऱ्या येथील चाकरमान्यांनी एक दिवस आपल्या गावासाठी या न्यायाने आपले हात राबवत आपल्या राजापूर गावातील साफसफाई करत पूर्ण रहिवासी भागाची स्वच्छता केली. हे आदर्शवत काम श्री भैरवनाथ क्रिकेट संघ राजापूर, महिला मंडळ, स्थानिक मंडळ तसेच मुंबई मंडळाच्या ऐक्याच्या जोरावर शक्य झाले. मागील काही वर्षांपासून असा स्वच्छतेचा उपक्रम राबविणारे दापोली तालुक्यातील राजापूर हे एकमेव गाव आहे. अशा या राजापूर गावाचा आदर्श हा सर्वांसाठी प्रेरणादायी असाच आहे.
दापोली तालुक्यातील देहन पंचक्रोशीतील राजापूर गाव तसे दुर्गमच अशा या गावात कार्यरत असलेली स्थानिक स्वराज्य संस्था ग्रुप ग्रामपंचायत देहेन आहे. अशा देहेन ग्राम पंचायतीच्या वतीने कायमच ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेतला जातो हे झाले शासनाच्या आदेशानुसार मात्र त्यापलीकडे जाऊन आपल्या गावाची आपणच स्वच्छता राखली पाहिजे, या कर्तव्याने गेली काही वर्षे सातत्याने राजापूर येथील स्थानिक ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच मुंबई मंडळ त्याचबरोबर श्री. भैरवनाथ क्रिकेट संघ यांच्या सहकार्याने दरवर्षी एक दिवस गावातील जिल्हा परिषद शाळाचे परिसर, सार्वजनिक पाणवठ्याच्या जागा, अंगणवाडी परिसर, सामाजिक सभागृह परिसर, रस्त्याची दुतर्फा गटारे, सार्वजनिक जागा तसेच गावातील रहिवासी भागातील सर्व प्रकारची साफसफाई करून गाव स्वच्छ झाडून साफसफाई केली जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे पावसाळ्यात रहिवासी भागात पावसाच्या पुराच्या पाण्याने काही प्लास्टिक कचरा, पालापाचोळा वाहून येत तो साचून राहू नये, पाण्याची डबकी तयार होवून त्यात डासांची उत्पत्ती होवून त्यातून गावात राहणाऱ्या कोणाही रहिवाशांना संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी खबरदारी घेतली जाते.
अशा या स्वच्छता मोहीम अभियानाची सुरुवात मुंबई मंडळाचे अध्यक्ष तुकाराम गणपत चिखले आणि ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष मारुती गणपत मोकल यांच्या नेतृत्वाखालील मार्गदर्शनाखाली सकाळी 7 वाजता करण्यात आली. यावेळी मुंबई येथे राहणारे चाकरमानी तसेच स्थानिक महिला पुरुष अशा साधारण 120 हून अधिक ग्रामस्थांनी हाती झाडू घेत स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरून गाव झाडून स्वच्छ चकाचक केला. या स्वच्छता मोहीमेत देहेन ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच ममता तांबे, ग्रामसेवक अविनाश जंगम यांनी उपस्थित राहून स्वच्छता मोहीमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला तर ग्रामपंचायत सदस्य बाबुराव चिखले, ग्राम पंचायत सदस्या मनाली चिखले यांनी देखील संपूर्ण वेळ उपस्थित राहून या स्लच्छतेच्या महत कामात ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले.


























































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.