loader
Breaking News
Breaking News
Foto

शिर्के प्रशालेच्या प्रेम पाटील याला एन. सी. सी. बेस्ट कॅडेट अवॉर्ड जाहीर

रत्नागिरी - 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट कोल्हापूर एनसीसी ग्रुपचा बेस्ट कॅडेट अवॉर्ड रत्नागिरीतील शिर्के प्रशालेचा विद्यार्थी प्रेम विनोद पाटील याला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार एनसीसी मधील प्रतिष्ठेचा मानला जातो. प्रेम विनोद पाटील शिर्के प्रशालेत इयत्ता दहावीचे शिक्षण घेत आहे. 2025 मध्ये प्रेम पाटील यांनी ही चाचणी दिली होती. एनसीसीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेटना हा पुरस्कार दिला जातो. एनसीसीमधील ड्रिल, परेड, लेखी परीक्षा, मुलाखत, शिबिरे, शिस्त आणि नेतृत्व क्षमता या मूल्यांकनामधून प्रेमची निवड झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिर्के प्रशालेच्या इतिहासात पहिल्यांदा हा पुरस्कार मिळाल्याची प्रतिक्रिया एनसीसी चे मार्गदर्शक आर.व्ही गद्रे यांनी व्यक्त केली. प्रेम पाटील याला बेस्ट कॅडेट म्हणून रोख पारितोषिक प्रमाणपत्र आणि सन्मान दिला जाणार आहे. त्यांच्या यशाबद्दल कमांडर रामजुळ दिक्षित यांच्यासह शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तसेच एनसीसी सी.आय. केदार आंग्रे, परमेश्वर कोपले इतर कर्मचारी वृद्ध आणि रत्नागिरी करांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बेस्ट कॅडेट पुरस्काराचा उद्देश नेतृत्व गुण, देशभक्ती, प्रशिक्षणातील गुणवत्ता आणि विविध एनसीसी उपक्रमाबद्दल सहभाग यांचा गौरव करणे हा आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg