loader
Breaking News
Breaking News
Foto

देशपातळीवरील आंबा स्पर्धेत करंजारीच्या हेगिष्टे बंधूंचा हापूस प्रथम

देवळे (संगमेश्वर) (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील करंजारी गावचे प्रगतीशील शेतकरी राजेश रवींद्र हेगीष्टे व सागर रवींद्र हेगीष्टे बंधूंनी यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या देशस्तरीय मिलांज आंबा महाराजा आंबा प्रदर्शन व स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट हापूस आंबा फळ विभागात प्रथम क्रमांकाचे मानाचे पारितोषिक पटकावले आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. हेगिष्टे बंधुनी आपले वडील रवींद्र एकनाथ हेगिष्टे यांच्या नावावर प्रदर्शनात व स्पर्धेत भाग घेतला होता. दि. १५ ते ३१ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या प्रदर्शनात देशभरातील नामांकित आंबा उत्पादकांनी सहभाग घेतला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अत्यंत दर्जेदार, आकर्षक व उत्कृष्ट गुणवत्तेच्या रत्नागिरी हापूस आंब्यामुळे हेगीष्टे बंधूंना हा बहुमान प्राप्त झाला. या यशाबद्दल क्रांती व्यापारी संघटना देवरुखतर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या उल्लेखनीय यशामुळे संगमेश्वर तालुक्यातील हापूस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले असून अधिकाधिक उत्कृष्ट प्रतीचा रत्नागिरी हापूस आंबा उत्पादनासाठी शेतकरी प्रेरित होत आहेत. रत्नागिरी हापूस हा केवळ फळ नसून कोकणच्या कष्टकरी शेतकर्‍यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि गुणवत्तेच्या परंपरेचे प्रतीक आहे. शेतकर्‍यांच्या अथक परिश्रमातून निर्माण होणारा हा हापूस जगभरातील ग्राहकांना चव, सुगंध आणि तृप्तीचा आनंद देत राहणार असल्याची ही गौरवास्पद पोचपावती मानली जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg