loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यात ४,३०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

खेड - खेड तालुक्यात जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था महाराष्ट्र आणि शिक्षण महर्षी तु. बा. कदम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १५ शाळांमधील सुमारे ४३०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम प्रथमच खेड तालुक्यात राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, एल. पी. स्कूल खेड, कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल मुरडे, छत्रपती संभाजी महाराज सैनिक स्कूल जामगे, प्रभात हायस्कूल शिवतर, न्यू इंग्लिश स्कूल पन्हाळजे, होडकाड, तुंबाड, शिर्शी, कविता सराफ हायस्कूल लोटे, हिंदवी गर्जना स्कूल आवाशी, सदगुरू काडसिद्धेश्वर हायस्कूल गुणदे, न्यू इंग्लिश स्कूल बोरज आणि ज्ञानदीप हायस्कूल बोरज येथील विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमामागे निलेश सांबरे यांचे मार्गदर्शन असून त्यांच्या माध्यमातून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सुमारे ३६ लाख वह्यांचे वाटप केले जाते. यावेळी संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, पोलिस भरती प्रशिक्षण, तसेच पालघर, ठाणे आणि रत्नागिरी येथील भगवान सांबरे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय ३९ पैकी ९ मोफत रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांसाठी विविध संगणक कोर्सेसही मोफत उपलब्ध करून दिले जातात. शिक्षण महर्षी तु. बा. कदम प्रतिष्ठान तर्फे लवकरच खेड येथे अद्ययावत मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरित करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमास श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचे स्कूल कमिटी चेअरमन राजेशभाई बुटाला, शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते, युवासेना जिल्हाध्यक्ष दर्शन महाजन, नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर, प्रेमळ चिखले, यश खेडेकर, नगरसेविका वैभवी खेडेकर, आरती पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र आंब्रे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था महाराष्ट्र चे प्रवक्ते अमर राऊत, साहिल गोरे, मुकेश होरम्बे आणि शिक्षण महर्षी तु बा कदम प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमित कदम, अभिजित कदम, हर्षल गोलांबडे, शुभम मेटकर, मनोहर पाडावे, आशिष धाडवे, तानाजी पाटील, अनंत गोरीवले तसेच विविध शाळांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg