रत्नागिरी: रत्नागिरीच्या मातीत शुक्रवारी आणि शनिवारी जणू चंद्राचा प्रकाश जमिनीवर अवतरला होता. ३० दिवसांच्या अत्यंत खडतर उपासनेनंतर (रोजा) आलेल्या रमजान ईदचा उत्सव रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात साजरा झाला. या उत्सवात जिल्ह्याच्या विविध भागांत आनंदाचे उधाण आले असले, तरी खऱ्या अर्थाने बाजी मारली ती मिरकरवाडा परिसराने. येथील अभूतपूर्व विद्युत रोषणाई आणि ओसंडून वाहणारा उत्साह पाहून उपस्थित प्रत्येक जण मंत्रमुग्ध झाला होता. मिरकरवाडा परिसरातील सात मोहल्ले आणि चार प्रमुख मशिदींवर करण्यात आलेली नयनरम्य रोषणाई पाहण्यासाठी संपूर्ण रत्नागिरी शहरातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विशेषतः पांजरी मोहल्ल्यातील चांद-ताऱ्यांची आकर्षक सजावट आणि तिथे तयार करण्यात आलेले सेल्फी पॉईंट्स तरुणाईसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
या सणाचे आणखी एक कौतुक म्हणजे, रणरणत्या उन्हातही अवघ्या ४ ते ५ वर्षांच्या चिमुकल्यांनी पूर्ण ३० दिवस रोजा पाळून आपला ईमानी जज्बा दाखवून दिला, ज्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आखाती देशांत युद्धाचे सावट आणि विमानांच्या तिकिटांचे गगनभिडू दर असूनही, आपल्या मातीतील सणाचा आनंद घेण्यासाठी अनेक चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने रत्नागिरी गाठली. या उत्सवाचा रंग तेव्हा अधिकच गडद झाला, जेव्हा राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी प्रत्यक्ष मिरकरवाड्यात हजेरी लावली. ना. सामंत यांनी आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून मुस्लीम बांधवांची आपुलकीने विचारपूस केली आणि त्यांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. "हा सण केवळ आनंदाचा नसून तो सामाजिक ऐक्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे," अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. नामदारांच्या या भेटीने आणि त्यांनी दिलेल्या 'ईद गळाभेटी'मुळे हिंदू-मुस्लिम बांधवांच्या मनातील स्नेह अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी ना. सामंत यांच्यासोबत त्यांचे जुने सहकारी व जिवलग मित्र शब्बीर वस्ता, नगरसेवक सोहेल साखरकर, नगरसेविका अफरीन होडेकर, माजी नगरसेवक नुरुद्दीन पटेल, चेअरमन इमरान मुकादम, मझर मुकादम, राजू शेठ, मसूद मुकादम, उबेद होडेकर आणि यासीन मजगावकर यांच्यासह इतर अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील या थेट संवादामुळे परिसरातील आनंदाचे वातावरण अधिकच द्विगुणित झाले असून, रत्नागिरीच्या सामाजिक सलोख्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.



.jpg)





























.jpg)































































































































































































































































































































.jpg)















29.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.