आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील जामसूद गावात ग्रामदैवत सोनसाळवी देवीच्या शिमगोत्सवाची सांगता अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. दरवर्षीच्या परंपरेनुसार गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी शिंपणे उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक ‘खुणा काढणे’ या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जवळपास महिनाभर चाललेल्या गावभेटीनंतर देवीची पालखी पुन्हा मंदिरात आगमन करताच परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. ढोल-ताशे आणि सनईच्या गजरात ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने पालखी नाचवत शिंपणे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
दरम्यान, या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणारा ‘खुणा काढणे’ हा कार्यक्रम शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आहे. या प्रथेनुसार, भाविक आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून गुप्त ठिकाणी जमिनीत नारळ लपवून ठेवतात. त्यानंतर पालखीचे भोई कोणतीही पूर्वकल्पना नसताना तो नारळ शोधून काढतात. असे घडल्यास संबंधित भाविकाची मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे. जामसूद गावातील ही अनोखी परंपरा राज्यभरातील भाविकांना आकर्षित करत असून, दरवर्षी मोठ्या संख्येने तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातून भाविक येथे दाखल होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. यावेळी मानकरी आणि प्रमुख प्रकाश साळवी यांनी सोनसाळवी देवीची महत्वपूर्ण माहिती सांगितली.



.jpg)





























.jpg)































































































































































































































































































































.jpg)















26.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.