loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यातील नद्या घेणार मोकळा श्वास!

​रत्नागिरी : कोकणातील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधील गाळ काढण्याच्या मोहिमेने आता मोठी गती घेतली आहे. चिपळूणची वाशिष्ठी, खेडची जगबुडी आणि राजापूरच्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पात्रात साचलेला गाळ बाहेर काढण्यासाठी शासन आणि सामाजिक संस्थांनी कंबर कसली असून, यामुळे नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. ​चिपळूणच्या वाशिष्ठी नदीमध्ये सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने अलोरे येथून पाच एक्स्कॅव्हेटर आणि ११ डंपर या मोहिमेत उतरवले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे, यंदाच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ९७,६३१ घनमीटर गाळ काढण्यात आला असून, नाम फाउंडेशननेही यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. डिसेंबर २०२१ पासून आजतागायत वाशिष्ठीतून तब्बल २१.३६ लक्ष घनमीटर गाळ उपसण्यात प्रशासनाला यश आले आहे. ​खेडची जीवनवाहिनी असलेल्या जगबुडी नदीतही जलसंपदा विभागाची यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहे. याठिकाणी तीन एक्स्कॅव्हेटर आणि तीन डंपरच्या साहाय्याने गाळ काढला जात असून, २०२४ पासून आतापर्यंत ५१,०७९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे नदीची पाणी साठवण्याची क्षमता वाढून पावसाळ्यातील पुराचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.

टाईम्स स्पेशल

​दुसरीकडे, राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी जिल्हा नियोजन समितीने विशेष पुढाकार घेतला आहे. मागील वर्षी सुमारे २९,३७० घनमीटर गाळ काढल्यानंतर, यंदा या कामासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी अतिरिक्त ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच, विलवडे मुचकुंदी नदीसाठीही २० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी 'नाम फाउंडेशन'च्या यंत्रसामग्रीद्वारे गाळ काढण्यासाठी वापरला जाणार असून, लोकसहभाग आणि शासकीय निधीचा हा संगम राजापूरच्या नद्यांना नवसंजीवन देणारा ठरणार आहे. ​ रत्नागिरीतील या नद्यांमधील गाळ उपसा मोहिमेमुळे केवळ पुराचा धोकाच टळणार नाही, तर नद्यांची नैसर्गिक वहनक्षमता सुधारून पर्यावरणाचे रक्षण होण्यासही मदत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg