loader
Breaking News
Breaking News
Foto

चंद्रकांत भोईर ‘द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज’ ऍवार्डने सन्मानित

रसायनी (राकेश खराडे) - आर्ट्स, टुरिझम अँड कल्चर फेस्टिव्हल समिती गोवा आणि नागेश महारुद्र फाउंडेशन, गोवा यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद सन २०२६ लक्षवेधी पुरस्कार वितरण सोहळा पणजी येथील कला व संस्कृती संचनालय भवनात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी पलस्पे ग्रामपंचायतीचे लगादार २५ वर्षे कालावधी पूर्ण करणारे माजी सरपंच चंद्रकांत अर्जुन भोईर यांना द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने अभिनेते अभय खडपकर, जेष्ठ साहित्यिक डॉ.उल्हास देशमुख, आमदार रोडोल्फो फर्नांडिस, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर तसेच देशभरातील पुरस्कारकर्ते उपस्थित होते. दरम्यान माजी सरपंच चंद्रकांत भोईर यांनी आपल्या २५ वर्षे सरपंच कारकिर्दीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. ग्रामपंचायत हद्दीत त्यांनी नागरिकांना भेडसावणार्‍या विविध समस्यांना सामोरं जात निराकरण केले. सामाजिक कार्यात ते वयाच्या ७३ वर्षांनंतरही कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यावर प्रेरीत होवून सरपंच चंद्रकांत अर्जुंन भोईर यांना अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने सोशल वर्कमध्ये डॉक्टरेट प्रदान केली आहे. देशातील अनेक संघटनांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन समाजोपयोगी पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांना पणजी गोवा येथील शासनाच्या संस्कृती भवनात द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज अवार्डने सन्मानित केल्याने राज्यासह रायगडातून विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg