loader
Breaking News
Breaking News
Foto

गवंडीवाडा येथील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील गवंडीवाडा येथील श्रीराम मंदिरात प्रतिवर्षा प्रमाणे गुरुवार दि. २६ मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा व गुरुवार दि. २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यंदा उत्सवाचे १२७ वे वर्ष आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानिमित्त गुरुवार दि. २६ मार्च रोजी सकाळी ११ वा. बाळ कासरलकर यांचे सुश्राव्य कीर्तन, दुपारी १२ वा. श्रीराम जन्मोत्सव, दुपारी १ ते ३ महाप्रसाद रात्रौ ९ वा. माऊली वारकरी दिंडी मोर्वे यांचे विठुरायची पंढरी, शनिवार दि. २८ मार्च रात्रौ ९ वा. श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्यमंडळ, गवंडीवाडा यांचे एक विनोदी नाट्यपुष्प 'बापाची कमाल पोराची धमाल' (लेखक संदीप चिपकर) सादर होणार आहे. गुरुवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी ६ वा. हनुमान जन्म, रात्रौ. ९ वा. श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्यमंडळ गवंडीवाडा यांचे एक ऐतिहासिक नाट्यपुष्प 'शिवशाहीचा शिरपेच' (लेखक आबासाहेब आचरेकर, दिग्दर्शक महेश सावंत पटेल) होणार आहे. तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर गवंडीवाडा यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg