loader
Breaking News
Breaking News
Foto

चेतन बोडेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

वैभववाडी (प्रतिनिधी) - चेतन बोडेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर'ध्येय एज्युकेशन आयकॉन्स समिट २०२५' या राज्यस्तरीय भव्य कार्यक्रमात होणार वितरन ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सुदाम शेंडगे यांनी नुकतीच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यामंदिर खांबाळे धनगरवाडी येथील शिक्षक चेतन बोडेकर यांची निवड झाली आहे. चेतन बोडेकर हे सध्या विद्यामंदिर खांबाळे धनगरवाडी ता. वैभववाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी यापूर्वी विद्यामंदिर सांगुळवाडी टेंबवाडी, विद्यामंदिर लोरे मांजलकरवाडी व जि. प. शाळा. श्री रामेश्वर विद्यामंदिर एडगाव नं १ ता. वैभववाडी येथे सेवा बजावली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इंग्रजी संभाषण कौशल्य विकास, शालेय- सहशालेय उपक्रम, शैक्षणिक उठाव, लोकसहभाग, कृतिसंशोधन या उपक्रमांची त्यांनी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास व शालेय भौतिक विकास साधला आहे. तसेच त्यांनी इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक व समन्वयक म्हणून जिल्हा व राज्य स्तरावर विविध उपक्रमांत काम पाहिले आहे. अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा, इंग्रजी विषय दिनदर्शिका निर्मिती यामध्ये देखील राज्यस्तरावर योगदान दिले आहे. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना कै. बा. रा. कदम गुरुजी ज्ञानदर्शी शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार, दीपकभाई केसरकर मित्रमंडळ आयोजित गुरुसेवा सन्मान पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तर त्यांच्या 'गावय' या मालवणी काव्यसंग्रहास कोकण मराठी साहित्य परिषदेचा 'कवी वसंत सावंत काव्य पुरस्कार' प्राप्त झाला आहे.

टाईम्स स्पेशल

सध्या ते एस. आर. दळवी फाऊंडेशन, टीचर टॉक फोरमचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत असून शिक्षक सक्षमीकरण व पर्यावरण संवर्धन संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करीत आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांनी शालेय परीक्षा, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये उत्तम यश संपादन केले आहे. महाराष्ट्रासह देशभर लौकिक असणाऱ्या ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेद्वारे त्यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. सदर पुरस्काराचे वितरण २९ मार्च २०२६ रोजी 'ध्येय एज्युकेशन आयकॉन समिट' या कार्यक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते ग. दि. माडगुळकर सभागृह पुणे येथे होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg