loader
Breaking News
Breaking News
Foto

​भारत- पाकिस्तान - चीन व इस्राईल युद्धातील वीरयोद्धा विठ्ठल सावंत यांचा कलंबिस्त येथे सन्मान

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - भारत-पाक, भारत-चीन आणि थेट इस्राईलच्या रणभूमीवर शत्रूशी दोन हात करणारे मराठा लाइट इन्फंट्रीचे शूर सैनिक विठ्ठल बाबाजी सावंत यांचा जिल्हा ग्रंथालय संघ व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला. वयाची ९० वर्षे पूर्ण केलेल्या या जिद्दी सैनिकाचा सत्कार करताना, "एका खऱ्या देशसेवकाच्या चरणांना स्पर्श करणे हे माझे भाग्य असून, अशा लोकांमुळेच आपण आज सुखी आहोत," असे भावोद्गार जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी काढले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व कोमसापच्या वतीने सध्या जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेटी देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त हे गाव सैनिकी परंपरेसाठी ओळखले जाते. याच गावातील ९० वर्षीय माजी सैनिक विठ्ठल सावंत यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक युद्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या निवासस्थानी जाऊन ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांच्या जीवन प्रवासाचा गौरव केला. ​सत्काराला उत्तर देताना विठ्ठल सावंत यांनी आपले अनुभव मांडले. ते म्हणाले, "सैन्य दलात मिळालेली युद्ध मेडल हीच माझी खरी कमाई आहे. ४० वर्षांपूर्वी आम्ही इस्राईलमधील युद्धात सहभागी झालो होतो, त्या आठवणी आजच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे पुन्हा ताज्या झाल्या आहेत. आजच्या युद्धाचे स्वरूप बदलले असून त्याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. मात्र, देशसेवा हीच माझ्या जगण्याची ऊर्जा आहे."

टाइम्स स्पेशल

​विठ्ठल सावंत यांनी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये १५ वर्षे सेवा बजावली. १९७१ चे भारत-पाक युद्ध, १९७२ चे भारत-चीन युद्ध आणि इस्राईलमधील दीड वर्षांचा कठीण काळ त्यांनी अनुभवला आहे. सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर त्यांनी कुडाळ येथील वायमन गार्डनमध्ये २० वर्षे सेवा दिली, तसेच कृषी व आध्यात्मिक क्षेत्रातही योगदान दिले आहे. ९० व्या वर्षीही त्यांचे आरोग्य सुदृढ असून त्यांचे वाचन व संवाद कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. ​या सोहळ्याला जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ, जिल्हा संचालक ॲड. संतोष सावंत, गुरुनाथ मडवळ, सतीश गावडे, कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाचे उपाध्यक्ष रमेश सावंत उपस्थित होते. तसेच सिद्धेश सावंत, वैष्णव सावंत, कुणकेरी मुख्याध्यापिका अर्चना सावंत, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका स्मिता शेट्ये, श्रद्धा सावंत, काव्या सावंत, रुक्मिणी सावंत, संदीप सावंत, साधना सावंत व तेजश्री सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रशांत लोंढे, सागर लोंढे ,अर्चना सावंत, सिद्धेश सावंत ,वैष्णव सावंत, सुविधा सावंत, श्रद्धा सावंत, अनिता राणे, गणेश राणे, गौरी राणे, दिव्या सावंत ,वैभव सावंत, निनाद सावंत , सुचिता सागर लोंढे यांनी त्यांच्या आठवणी विषद केल्या सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय अध्यक्ष मंगेश मस्के म्हणाले,​"मी माझ्या आईला आणि साहित्यिक गुरु पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना दैवत मानतो. त्यानंतर या ९० वर्षांच्या शूर योद्ध्याच्या चरणांना स्पर्श करताना माझे मन भारावून गेले. आजच्या तरुण पिढीसाठी विठ्ठल सावंत यांचा संघर्षमय प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg