loader
Breaking News
Breaking News
Foto

चवदार तळ्यासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल स्वाभिमानी युथ रिपब्लिकनच्यावतीने शासनाचे आभार

पनवेल : महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे ५७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्यावतीने विशेष आभार मानण्यात आले. स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्यावतीने चवदार तळे महाड येथे ९९ वा क्रांती दिन संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष सागर भाई संसारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे होते. त्याचबरोबर मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित हिरवे, महासचिव अशोक वाघमारे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष विजय धोत्रे, महाड तालुका अध्यक्ष सुजित जाधव, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष सहयोग लोखंडे, पनवेल विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष निलेश कांबळे त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी भीमगीताचा कार्यक्रम संपन्न केला. त्याचबरोबर अनेक गायकांनी भीम गीते गायले. या सभेसाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे ५७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व भीम बांधवांच्यावतीने व पक्षाच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg