loader
Breaking News
Breaking News
Foto

खरातची 'दैवी' शक्ती उतरली, विशेष तपास पथकाकडून अशोक खरातची चौकशी सुरु

नाशिक- दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या भोंदूची रविवारी नाशिक पोलिसांनी चांगलीच धुलाई केल्याचे दिसते. गेल्या दोन दिवसांपासून विशेष तपास पथकाकडून अशोक खरातची चौकशी सुरु होती. रविवारी त्याला पुन्हा नाशिक गुन्हे शाखेच्या हवाली करण्यात आले. मात्र चौकशीनंतर गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडताना अशोक खरातची अवस्था अत्यंत केविलवाणी दिसली. अनेक बडे नेते आणि उद्योगपतींना शक्तीवर्धक गोळ्यां व सिरपचे वितरण करणाऱ्या खरातच्या पायात चालण्याचेही त्राण उरले नाही. क्राईम ब्रँचच्या कार्यालयातून लंगडत, कण्हत बाहेर पडतानाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरात विरोधात नवी तक्रार दाखल केल्यानंतर नाशिक गुन्हे शाखेला काही माहिती आवश्यक असल्याने एसआयटीकडून त्याचा पुन्हा ताबा मिळवला गेला. रविवारी दुपारी खरातला क्राइम ब्रँचच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे विशेष तपास पथकात नवीन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. महिला अधिकाऱ्यांचा समावेश करून पीडित महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्याकडे दैवी शक्ती असल्याच्या बाता मारणाऱ्या भोंदू खरातला रविवारी नाशिक पोलिसांनी आपला खाक्या दाखवला. त्याचा गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर येतानाचा व्हिडिओ व्हायरल झाली असून सर्व स्तरातून त्याबाबत पोलिसांच्या कामगिरीचे स्वागत होत आहे. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे दावे करणाऱ्या भोंदू खरात याला आता पोलिसांसमोर बोलण्याची शक्ती सुद्धा न उरल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अशोक खरात दोन पोलिसांच्या साहाय्याने कसाबसा चालत नाशिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर पडला. यावेळी दोन पोलिसांनी त्याला धरले होते.अशोक खरात लंगडत आणि कण्हत चालत होता. गेल्या दोन दिवसांपासून तेस्वीनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडून अशोक खरातची चौकशी सुरु होती. रविवारी त्याला पुन्हा नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या हवाली करण्यात आले. अलीकडच्या काळात नाशिक पोलिसांचे ब्रीदवाक्य झालेले 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला', हे वाक्यही खरातने कसेबसे पुटपुटले. त्यानंतर अशोक खरात पोलिसांसोबत गाडीत जाऊन बसला. तेव्हाही अशोक खरातने स्वत:ची मान शेजारच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर टाकल्याचे पाहायला मिळाले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg