मालवण (प्रतिनिधी) - मालवण वायरी येथील जागृत देवस्थान कुलस्वामिनी श्री केळबाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दि. २४ मार्च ते गुरुवार २६ मार्च या कालावधीत रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंगळवार २४ मार्च रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत आई केळबाई देवीचे नामस्मरण, १० ते दुपारी १२ या वेळेत दुर्गा सप्तशती पाठवाचन, सायंकाळी ५ वाजता महिला भजन, रात्री ९.३० वाजता आई पावणाईदेवी समई नृत्य मंडळ, किंजवडे परबवाडी, देवगड यांचा समई नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. बुधवार, २५ रोजी सकाळी ८ वाजता समुद्र स्नानाकरिता देवीची सवाद्य पालखी मिरवणूक, दुपारी १२ वाजता श्री केळबाई देवीला कलशस्नान व पूजा, १२.३० वाजता श्री केळबाई देवीला सामुहिक अभिषेक, दुपारी २ वाजता चैत्र शुद्ध सप्तमी महाप्रसाद, दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत वैद्यकीय शिबीर, सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ वाजता श्री केळबाई देवी प्रासादिक भजन मंडळ, मुंबई यांचे सुश्राव्य भजन, रात्री ९ वाजता आई केळबाईची आरती, ९.३० वाजता मालवण नगरपालिकेतून निवडून आलेल्या नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका यांचा सत्कार, १०.३० वाजता स्थानिक कलाकारांचे करमणुकीचे कार्यक्रम, गुरुवार, २६ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता श्री मूर्तीवर पंचामृत अभिषेक व स्नान, ९ वाजता श्री केळबाई देवीला सामूहिक अभिषेक, ११ वाजता होम हवन, दुपारी १२ वाजता महाआरती, १ वाजता चैत्र शुद्ध अष्टमी महाप्रसाद, दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत आरोग्य तपासणी शिबीर, सायंकाळी ७वाजता स्थानिक कलाकारांचा गायनाचा कार्यक्रम, रात्री ९ वाजता आई केळबाईची आरती, १० वाजता मंदिरांभोवती पालखी प्रदक्षिणा, ११ वाजता दत्त माऊली दशावतार मंडळ, दाभोली वेंगुर्ले यांचे दशावतारी नाटक होणार आहे.
या जत्रोत्सवासाठी समस्त मयेकर बंधू मंडळ, मुंबईचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मुंबईकर चाकरमानी मालवणात दाखल झाले आहेत. सर्वांनी या जत्रेस उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष बलवंत मयेकर, सरचिटणीस चंद्रकांत मयेकर, खजिनदार प्रमोद मयेकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.





















.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.