loader
Breaking News
Breaking News
Foto

वाघणगांवमध्ये क्रिकेटचा थरार! ‘बीसीसी देऊळवाडी’ ठरला महाविजेता!

मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील वाघणगांव डोंगरेवाडी येथील ग्रामदैवत श्री वाघजाई देवीच्या आशीर्वादाने आयोजित ‘श्री वाघजाई चषक २०२६’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा समारोप अत्यंत उत्साहात पार पडला. मुंबईतील दादर परिसरात या स्पर्धेची विशेष चर्चा रंगली होती. २४ बलाढ्य संघांच्या सहभागाने रंगलेल्या या स्पर्धेत बीसीसी देऊळवाडी (राजापूर) संघाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर अजिंक्यपद पटकावत चषकावर आपले नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजीचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळाला. अटीतटीच्या अंतिम सामन्यात राजापूरच्या ’बीसीसी देऊळवाडी’ संघाने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम (विजेता) बीसीसी देऊळवाडी राजापूर, द्वितीय (उपविजेता) श्री सातमाई नव्हाणकरीण बॉईज बोरीवली, दापोली, तृतीय (क्रमांक ) डीसीसी, दत्तवाडी गोवळ, वाघजाई ईलेव्हन क्रिकेट संघ, वाघणगांव डोंगरेवाडी यांच्यावतीने या स्पर्धेचे चोख नियोजन करण्यात आले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व खेळाडू आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg