loader
Breaking News
Breaking News
Foto

तुरळ हरेकरवाडी येथे विहिरीत गवारेडा पडला

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी मौजे तुरळ हरेकरवाडी स्थानिक नाव म्हाताऱ्याचं कोंड या ठिकाणी सकाळी ९:३० वाजता श्री विष्णू हरडे यांचे मालकीच्या विहिरीमध्ये गवारेडा हा वन्य प्राणी पडला असले बाबत पोलीस पाटील तुरळ यांनी कळवलेनुसार परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख व सर्व स्टाफ मिळून आवश्यक साहित्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता, सदर विहीर ही सुमारे १५ ते 2० फूट खोल व सुमारे १५ फूट x २० फूट आकाराची असल्याचे दिसून आले. सदर विहिरीत एक रानगवा अंदाजे दीड वर्षे वयाचा पडल्याचे दिसून आले व त्याला विहिरीबाहेर पडता येत नसल्याचे दिसून आले. सदर परिस्थितीची पाहणी केली असता सदर विहिरीला एका बाजूने जेसीबीच्या सहाय्याने वाट (रॅम) तयार करून विहिरीत अडकलेल्या रानगव्याला मोकळी वाट करून देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुमारे सहा तासानंतर सदर तयार केलेल्या मार्गावरून रानगवा दुपारी ३:30 वा बाहेर काढण्यात आले. सदरील रानगवा जंगलाच्या दिशेने नैसर्गिक अधिवासात निघून गेले असल्याचे दिसून आले. सदरील रेस्क्यू ऑपरेशन माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरीजा देसाई, मा.सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, मा परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांचे मार्गदर्शनाखाली मा. वनपाल संगमेश्वर देवरुख सागर गोसावी, वनरक्षक आरवली सुरज तेली, वनरक्षक फुणगूस आकाश कडुकर, वनरक्षक दाभोळे सुप्रिया काळे, वनरक्षक साखरपा सहयोग कराडे यांनी केली. सदरील रेस्क्यू ऑपरेशन करतेवेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते त्यांचेही सहकार्य रेस्क्यू ऑपरेशन साठी लाभले.

टाइम्स स्पेशल

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 19 26 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने मा.परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख सागर गोसावी यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg