खेड : शिवसेना शिंदे गट लीगल सेल उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष ॲड. सुधीर बुटाला यांचे मार्गदर्शनाखाली खेड तालुका अध्यक्ष ॲड. दिलीप चव्हाण यांचे दीपक हॉटेल अँड रिसॉर्ट मध्ये "मृत्युपत्र " या विषयावर कायदेशीर व्याख्यान नुकतेच मोठ्या उत्साही आणि आनंदी वातावरणात पार पडले.
मृत्युपत्र कोणी कधी कसे करावे याविषयी सविस्तर माहिती ॲड. चव्हाण यांनी उपस्थितांना दिली. मृत्युपत्र विषयी अद्याप समाजात म्हणावी तेवढी जनजागृती दिसून येत नसल्याने वर्तमान परिस्थितीच्या विचार करता मृत्युपत्र केवळ जेष्ठ नागरिकांनीच नव्हे तर 18 वर्षावरील व्यक्तींनी करणे आवश्यक आहे. मृत्युपत्र करताना काही त्रुटी राहता कामा नये त्यासाठी वकिलाचा सल्ला घेऊनच बनविले तर ते योग्य असते, असे चव्हाण यांनी सांगितले. या कायदेशीर व्याख्यानाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते दीपक पंडित यांनी केले होते.
कार्यक्रमास महिला आणि पुरुष खेड, दापोली, चिपळूण इ. ठिकाणाहून मोठ्या संख्येने उपस्थित होते. मृत्युपत्र विषयी प्रेक्षकांच्या प्रश्नांना ऍड. चव्हाण यांनी समर्थक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. असे कायदे विषयक मार्गदर्शन वेळो वेळी घेणे काळाची गरज आहे आणि म्हणूनच आज इथे हा उपक्रम सुरु केला आहे, असे दीपक पंडित सरते शेवटी ऍड. चव्हाण यांना धान्यवाद देताना म्हणाले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
























1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.