loader
Breaking News
Breaking News
Foto

रविवारी देवळे येथे सकल हिंदू संमेलनाचे आयोजन

देवळे (प्रकाश चाळके) - रविवार दिनांक २६ रोजी देवळे (ता संगमेश्वर) येथे सकल हिंदू संमेलानाचे आयोजन करण्यात आले आहे. धर्माप्रती अभिमान आणि जातींचे उच्चाटन ह्या उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सकल हिंदू समाज तर्फे येत्या रविवारी देवळे येथील खडगेश्वर मंदिरात सकल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी चार ते सात ह्या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाचे महसूल विभागाचे निवृत्त मंडल अधिकारी दिलीप शिर्के हे संयोजक तर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय (बाबू) गांधी हे सहसंयोजक असतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ह्या संमेलनात देवरुख येथील संतोष जोशी आणि बुरबी येथील जयश्री जोग हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. हिंदुत्वासमोरील आव्हाने आणि उपाय तसेच पंचपरिवर्तन ह्या दोन विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहेत. तरी ह्या संमेलनात घाटीवळे, चोरवणे, करंजारी, देवळे, चाफवली, कनकाडी, मेघी, दाभोळे ह्या गावातील जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg