loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रखर संघर्षानंतर अखेर मोरगाव १४ पथदीप बसविले; ग्रामस्थातून व्यक्त होतय समाधान

साटेली भेडशी (प्रतिनिधी) - मोरगाव दलित वस्तीतील ग्रामस्थाच्या प्रखर संघर्षानंतर १४ सौर पथदिवे अखेर बसविण्यात आले. त्यामुळे येथील ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना तसेच जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून मोरगाव दलित वस्तीसाठी १४ सौर पथदिव्यांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, सरपंच संतोष आईर यांनी ठेकेदार यांना दलित वस्ती वगळून गावठाण व बागवाडी येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत बसविण्याचे आदेश दिले. या प्रकाराला दलित वस्तीतील ग्रामस्थानी प्रखर विरोध करत ग्रामस्थांनी काम थांबवले होते. सर्व पथदिवे दलित वस्तीत च बसविण्यात यावेत अन्यथा हा अन्याय सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संदर्भात गटाविकास अधिकारी दोडामार्ग, मोरगाव सरपंच यांना घेराव घातला होता. तसेच मोरगाव ग्रामपंचायतीत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. अखेर १४ ही सौर पथदिवे एप्रिल च्या १० तारीखच्या आत बसवून देण्याचे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार हे सर्व सौर पथदिवे दलित वस्तीत बसविण्यात आले. त्यामुळे येथील ग्रामस्थातून समाधान व्यक्त केल जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg