loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यात महिनाभरापूर्वी अल्पवयीन मुलीचे अपहरण

खेड (प्रतिनिधी) - तालुक्यातील बिजघर लाववाडी येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शनिवारी (२१ मार्च २०२६) मध्यरात्री सुमारे २.३० वाजताच्या सुमारास अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदविली आहे. आईने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी २१ मार्चच्या मध्यरात्रीपासूनच बेपत्ता आहे. सुरुवातीला मुलगी घरातच कुठेतरी असेल किंवा परिचितांकडे गेली असेल, या आशेने कुटुंबीयांनी शेजारी, नातेवाईक तसेच तिच्या मित्र-मैत्रिणींकडे शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही तिचा कोणताही मागमूस लागला नाही. मुलगी घरी परत येईल, या आशेवर कुटुंबीय काही काळ थांबले होते. परंतु दिवस जसजसे पुढे सरकत गेले, तसतशी चिंता वाढत गेली आणि अखेर अपहरणाची शक्यता गडद झाल्याने आईने पोलिसांकडे धाव घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, खेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १३७ (२) नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समेळ सुर्वे तपासाची सूत्रे हाताळत आहेत. दरम्यान, अपहरण झालेल्या मुलीविषयी कोणतीही माहिती असल्यास तत्काळ खेड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल तसेच योग्य ते बक्षीसही दिले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg