सावंतवाडी : गेली कित्येक वर्षे आपल्या अमोघ अभिनयाने आणि कसदार दिग्दर्शनाने सामाजिक नाटकांच्या विश्वात स्वतंत्र ठसा उमटवणारे निरवडे गावचे सुपुत्र प्रमोद गावडे यांनी तब्बल १३ वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर पाऊल ठेवत आपला दरारा सिद्ध केला. विशेष म्हणजे, या नाटकातील प्रत्येक सह-कलाकाराने दाखवलेले पात्रांचे गांभीर्य, अचूक संवादफेक आणि तासनतास घेतलेल्या मेहनतीतून सिद्ध झालेले पाठांतर यामुळे संपूर्ण नाटक एका व्यावसायिक उंचीवर पोहोचले. प्रमोद गावडे यांच्या अनुभवी मार्गदर्शनाला या सर्व तरुण आणि अनुभवी कलाकारांनी आपल्या चिकाटीची जोड दिल्यानेच निरवडेचा रंगमंच पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने उजळून निघाला. श्री देव भूतनाथ बारापंचायतन देवस्थानच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'कथा कुणाची व्यथा कुणाला' या नाटकात श्री गावडे यांनी केवळ प्रमुख भूमिकाच साकारली नाही, तर त्यांच्या दिग्दर्शनाखाली निरवडेतील स्थानिक कलाकारांच्या संचाने अभिनयाची जणू जुगलबंदीच सादर केली. एका कसदार दिग्दर्शकाचे मार्गदर्शन आणि समर्पित कलाकारांची चिकाटी यांच्या संगमातून हे नाटक प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेण्यात यशस्वी ठरले.
निरवडे गावच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत प्रमोद गावडे हे नाव आज एका अथांग वटवृक्षासारखे उभे आहे. गेली अनेक दशके त्यांनी सामाजिक नाटकांच्या माध्यमातून दिलेले योगदान केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून, ते एका संपूर्ण पिढीला संस्कारित करणारे ठरले आहे. श्री देव भूतनाथ बारा पंचायतन देवस्थान व मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिनानिमित्त १९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित 'कथा कुणाची व्यथा कुणाला' या तीन अंकी सामाजिक नाटकाने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.रंगभूमीवर वावरताना शब्दांची अचूक फेक, आवाजातील चढ-उतार आणि पात्राच्या वेशभूषेपासून ते अगदी रंगमंचावरील हालचालींपर्यंत प्रमोद गावडे यांचा असलेला सूक्ष्म अभ्यास कोणत्याही नवोदित कलाकारासाठी एक चालते-बोलते विद्यापीठच आहे. तब्बल तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांनी जेव्हा रंगमंचावर पाऊल ठेवले, तेव्हा त्यांचा तोच जुना अनुभव आणि आक्रमक अभिनय पाहून उपस्थित रसिक प्रेक्षक भारावून गेले. या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी केवळ अभिनयच केला नाही, तर दिग्दर्शनाची धुरा सांभाळत नव्या पिढीतील कलाकारांसमोर 'कलाकार कसा असावा' आणि पात्राचे गांभीर्य कसे जपायचे, याचे मूर्तिमंत उदाहरण सादर केले.
नाटकाची तांत्रिक बाजूही तितकीच भक्कम होती, ज्यामुळे या प्रयोगाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्माजी गावडे यांनी केले. नाटकाला संगीत साथ देण्यासाठी हार्मोनियम वादक म्हणून उमाकांत गावडे व पखवाज वादक म्हणून रोहन गावडे यांनी जबाबदारी उचलली. नाटकाचे पार्श्वसंगीत व ध्वनी संकलन विनय वाडकर व सुभाष शिरोडकर (बांदा) यांनी सांभाळले. प्रसंगांनुसार योग्य प्रकाश योजना सुरेश सातार्डेकर यांनी साकारली, तर रंगभूषा व नेपथ्य संजय जोशी आणि आप्पा महाराज रंगमंच (वेत्ये) यांनी चोख पार पाडले. विशेष सहाय्य म्हणून अनिल यादव यांनी सहकार्य केले. श्री देव भूतनाथ मंदिरात सकाळपासूनच अभिषेक, सत्यनारायण महापूजा आणि भजनानंतर रात्री १० वाजता श्री देव भूतनाथ युवक कला, क्रीडा व नाट्यमंडळाने सादर केलेल्या या नाटकाने उत्कंठा शिगेला नेली. प्रमोद गावडे हे केवळ रंगभूमीवरच नव्हे, तर समाजकारण आणि राजकारणाच्या मैदानातही तितकेच सक्रिय राहिले आहेत. 'कथा कुणाची व्यथा कुणाला' या नाटकाच्या नावाप्रमाणेच त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत, पण त्या प्रत्येक प्रसंगातून तावून-सुलाखून निघत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. निरवडे ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला असून, सर्व कलाकारांनी आपल्या कलेच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे.
























1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.