रायगड: जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात लोणेरे येथे घडलेल्या एका भीषण घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. भरदिवसा 'ओमकार रेसिडेन्सी' या लॉजिंगमध्ये एका तरुणीची निर्घृण हत्या झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलं असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणीला एका तरुणाने तिला लॉजमध्ये नेलं होतं. काही वेळातच तिच्यावर क्रूर हल्ला करून हत्या करण्यात आल्याचं उघड झालं. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती तणावपूर्ण बनू नये यासाठी पोलिसांनी तत्काळ कडेकोट बंदोबस्त तैनात केला. गोरेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी पंचनामा करून पार्थिव ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत तरुणीची ओळख पटली असून ती लोणेरे परिसरातीलच रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, तिला लॉजमध्ये घेऊन जाणारा संशयित तरुण हा रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. घटनेनंतर तो फरार झाला असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं तयार करून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे. त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, लॉजमधील कर्मचारी आणि इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्रेमसंबंधातून वाद झाला होता का? वैयक्तिक कारणांमुळे ही घटना घडली का? किंवा अन्य कोणता गुन्हेगारी हेतू होता का? याचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांकडून सर्व शक्य त्या दिशेने तपास केला जात असून तपासाची गती वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भरदिवसा अशा प्रकारची घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आरोपीला लवकरात लवकर अटक करून या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
























1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.