loader
Breaking News
Breaking News
Foto

पतसंस्थांची माहिती आता 'एमआयएस' प्रणालीवर; २२ एप्रिलला कुडाळमध्ये कार्यशाळा

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था नियामक मंडळ, पुणे यांच्यामार्फत राज्यातील ग्रामीण बिगरशेती, नागरी व पगारदार पतसंस्थांची आर्थिक माहिती 'एमआयएस' प्रणालीद्वारे संकलित करण्यात येणार आहे. या संदर्भात पतसंस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी बुधवार, २२ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन, जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि सैनिक नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा होईल. नियामक मंडळाने माहिती संकलनासाठी नवे निकष लागू केले असून त्याबाबत या प्रशिक्षणात सविस्तर माहिती दिली जाणार आहे. ​या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांच्या अध्यक्ष व व्यवस्थापकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ च्या माहितीसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg