खेड (दिलीप देवळेकर) - खेडमध्ये आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने काँग्रेस पक्षाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. लोकसभेमध्ये महिला आरक्षणासंदर्भातील विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला. तसेच अनेक महिला पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित राहून काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना महिलांनी स्पष्ट मत मांडलं की, महिलांना आरक्षणाची गरज ही फक्त राजकारणापुरती मर्यादित नसून समाजकारणातही तितकीच महत्त्वाची आहे. आरक्षण मिळाल्यास महिलांचा राजकारणातील सहभाग अधिक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या निर्णयाविरोधात शिवसेना महिला आघाडीने काँग्रेस पक्षाविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, नागराध्यक्षा माधवी बुटाला, सभापती पालेकर, उपसभापती सुनील मोरे, महेंद्र भोसले, नगरसेवक निकेतन पाटणे, मिनार चिखले, संजय मोदी, सुप्रिया पवार यांच्यासह शिवसैनिक व तमाम महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नारी शक्तीला बळ देणाऱ्या महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा खेड तालुका शिवसेनेच्यावतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने संयुक्तपणे हा निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकामुळे देशातील महिलांना राजकारणात आणि समाजकारणात हक्काचे स्थान मिळणार आहे. मात्र, या ऐतिहासिक निर्णयाला आणि नारी शक्तीच्या प्रगतीला काही घटक जाणीवपूर्वक विरोध करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. हा विरोध म्हणजे महिलांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न असून, खेड शिवसेनेने अशा विचारसरणीचा धिक्कार केला आहे.
नारी शक्तीचा सन्मान करणे हे शिवसेनेचे कर्तव्य असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक विधेयकाच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा आहे. या आंदोलनाद्वारे महिला विरोधी मानसिकतेचा निषेध करत, कोणत्याही परिस्थितीत महिलांचे आरक्षण आणि त्यांचे हक्क अबाधित राखण्यासाठी शिवसेना संघर्ष करेल, असा पवित्रा खेड मधील महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी घेतला आहे. यावेळी तहसीलदार खेड यांना निवेदन देण्यात आले.
























1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.