loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलिस दलामध्ये नव्याने पदनिर्मिती करण्याची गरज

रत्नागिरी - जिल्ह्याच्या सुरक्षेचा भार असलेल्या जिल्हा पोलिस दलातील मंजूर पदांची परिस्थिती ४६ वर्षानंतरही तशीच, असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्ह्याचा सामाजिक, भौगोलिक विस्तार झाला तरी ही विषमता काही कमी झालेली नाही. जिल्ह्याची लोकसंख्या आता १६ लाखाच्या वर आहे, तरी पोलिसांची मंजूर पदे १९८० नंतरही १ हजार ५७४ एवढीच आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडत आहे. १ हजार ०१६ लोकांमागे १ पोलिस, असे साधारण पोलिस बाळाचे गणित आहे. गृह विभागाने लोकसंख्येचा विचार करून पोलिस दलामध्ये नव्याने पदनिर्मिती करण्याची गरज आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्ह्याला गुन्हेगारीची फार मोठी किनार नसली तरी वाढत्या दळणवळणाच्या साधनामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीने जिल्ह्याला शिवले आहे. असे अनेक प्रकार उघडकीस आले असले तरी जिल्हा पोलिसदल अशा गुन्हेगारीला तेवढ्याच दमाने आणि ताकदीने तोंड देत आहे. त्यामुळे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये राज्यात जिल्ह्याचे काम समाधानकारक आहे; परंतु जिल्हा पोलिसदलाला भेडसावणारी सर्वांत मोठी समस्या आहे ती कमी मनुष्यबळाची. मनुष्यबळाच्या अभावमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना पोलिसांची प्रचंड दमछाक होत आहे. तपासातील गुणात्मक कामगिरीमुळे अजूनतरी खाकी वर्दीला जिल्ह्यात डाग लागेला नाही; मात्र लोकसंख्या आणि लोकांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलिस यांच्यात मोठी तफावत आहे. पोलिस दलातील पदनिर्मिती ही १९८० मध्ये जेवढी होती तेवढीच आहे. आज ४६ वर्षे झाली तरी १ हजार ५७४ एवढीच पोलिस दलातील मंजूर पदे आहे.

टाईम्स स्पेशल

राज्यातील इतरत्र जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. दरवर्षी सुमारे 1 हजार 300 च्या दरम्यान गुन्हे घडतात. त्यामुळे राष्ट्रीय गुन्ह्येगारीच्या तुलनेत आता रत्नागिरी मागे आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु या जनतेचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांची संख्या मात्र ४६ वर्षानंतरही तेवढीच आहे. ९ तालुक्यांमध्ये सुमारे १८ पोलिस ठाणे आहेत. ९ सागरी पोलिस ठाणे आहेत. वीजनिर्मितीतील कोयना धरण, जिंदाल, फिनोलेक्स, या कंपन्यांबरोबर राजापूरातील अनुऊर्जा आणि बारसू येथे येऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाने पोलिसांची कसोटी पाहिली. खेडामधील रासायनिक प्रकल्प, लक्ष्मी ऑरगॅनिक, राजापूरातील बॉक्साईड प्रकल्प आदीमुळे वातावरण गरम आहे. पोलिसांचा ताण वाढला आहे. मंत्र्यांचे दौरे, आंदोलने, मोर्चे, मारामारी किंवा जातीय तेढ, चोर्‍या, 24 तासाची ड्युटी, गस्त आदींमुळे पोलिस कर्मचारी हैराण होत आहेत. या सर्व जबाबदार्‍या सांभाळून पोलिस आपले कर्तव्य बजात आहेत. मात्र यामध्ये अधिक सुसूत्रता यावी, सक्षमता आणि पोलिस दलाचा धाक रहाण्यासाठी वाढत्या लोकसंख्येच्या तुलणेत आता पोलिस दलामध्ये नव्याने पदनिर्मिती होणे काळाची गरज आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg