loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी (प्रतिनिधी) - नेर्ले येथील श्री देव धावजी देवस्थानमध्ये बंदी आदेश लागू असताना गावातील दोघांनी प्रवेश केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी निर्लेतील महिलांनी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरुवात सायंकाळी उशिरापर्यंत उपोषण सुरू होते. नेर्ले येथील श्री देव धावजी देवस्थानच्या वार्षिक होळी उत्सवावरून काही वाद निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या अहवालानंतर तहसीलदारांनी शिमगोस्तव कालावधीत 27 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान बंदी आदेश लागू केला होता. मात्र हा आदेश लागू असतानाच 7 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 6 च्या सुमारास गावातील दोघांनी मंदिरात प्रवेश केल्याचा आक्षेप नीलम नवनाथ पांचाळ आणि आरती भालचंद्र सुर्वे यांनी घेतला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासंदर्भात संबंधित दोघांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी 16 मार्च रोजी वैभववाडी पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांकडे केली होती. मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. त्या दोघांवर कारवाई होण्याच्या मागणीसाठी पांचाळ व सुर्वे यांच्यासह गावातील इतर महिलांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. तहसील कार्यालयाच्या पथकाने उपोषणकर्त्यांची सकाळी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका महिलांनी घेतली आहे. त्यामुळे तहसील कार्यालयासमोर सुरू झालेले हे उपोषण आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg