loader
Breaking News
Breaking News
Foto

​परीक्षित मांजरेकर यांची शिवसेना (शिंदे गट) विधानसभा BLA प्रमुखपदी नियुक्ती

​सावंतवाडी (प्रतिनिधी): शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेत महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर यांची सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना 'बीएलए' (BLA) प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​परीक्षित मांजरेकर यांच्याकडे असलेल्या संघटनात्मक कौशल्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी काळात विधानसभा मतदारसंघ स्तरावर पक्षीय काम अधिक सक्षम करण्यासाठी आणि बूथ स्तरावरील नियोजनासाठी त्यांची ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. या निवडीबद्दल त्यांचे राजकीय क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg